Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांना धमकीचा फोन करणाऱ्या तरुणीला मंगळुरुमधून ताब्यात घेतले आहे. यानंतर नागपूर पोलिसांची एक टीम तातडीनं बेळगावला रवाना झाली आहे.ताब्यात घेतलेल्या तरुणीचे नाव रजिया असे आहे. आतापर्यंत झालेल्या तपासानुसार तीन वेळेला आलेल्या धमकीच्या फोन कॉलचे मंगळुरू कनेक्शन समोर आले आहे.
नितीन गडकरी यांच्या नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयजवळील जनसंपर्क कार्यालयात तीन वेळेस धमकीचा फोन आला होता. सुरुवातीला हा फोन बेळगावच्या तुरुंगामधूनच झाल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.दरम्यान आता मंगळुरू कनेक्शन समोर आले आहे.नागपूर पोलिस कसून चौकशी करत आहेत. सध्या रजिया नावाची तरुणी मंगळुरुच्या रुग्णालयात दाखल आहे. स्थानिक पोलीस सध्या चौकशी करत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








