न्हावेली / वार्ताहर
Union Minister Narayan Rane’s birthday was celebrated in Malgaon with various activities
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा वाढदिवस मळगाव येथे विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त मळगाव गावातील सर्व अंगणवाड्या व प्राथमिक शाळेतील मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. तसेच गावातील भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने राणे साहेबांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या कार्याबद्दल माजी सभापती राजेंद्र परब, सरपंच स्नेहल जामदार, उपसरपंच हनुमंत पेडणेकर, माजी सरपंच गणेशप्रसाद पेडणेकर, भाजपा अनुसूचित जाती सेल जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव, माजी ग्रामपंचायत सदस्य गुरुनाथ गावकर यांनी आपले विचार मांडले. यावेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.









