पणजी : केंद्रीय वाणिज्य-उद्योग, माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जतीन प्रसाद व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची आल्तिनो पणजी येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गाठ-भेट झाली. तसेच त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. विकसित भारत अर्थसंकल्प 2025 च्या अनुषंगाने प्रसाद हे गोव्यातील विविध कार्यक्रम-उपक्रमात सहभागी होण्यासाठी गोव्यात आले आहेत. गोव्यासह देशाची आर्थिक प्रगती व्हावी या हेतूने प्रसाद गोव्यात कार्यरत राहणार असल्याची माहिती डॉ. सावंत यांनी दिली. प्रसाद यांनी गोव्यातील इतर मंत्री-आमदार तसेच भाजप पदाधिकाऱ्यांशी पणजीत बैठक घेऊन चर्चा केली. तसेच त्यांना मार्गदर्शन केल्याचे वृत्त हाती आले आहे.
आमदार दिगंबर कामत, आमदार दाजी साळकर, माजी आमदार दयानंद सोपटे, गोवा प्रदेश अध्यक्ष दामू नाईक, माजी आमदार सिद्धार्थ कुंकळकर यांनी प्रसाद यांचे स्वागत केले व त्यांच्याशी विचारविनिमय केला. तसेच प्रसाद यांनी अर्थसंकल्पावर आधारित गोवा चेंबर ऑफ कॉमर्सच्या संचालक मंडळाशी संवाद केला. मग त्यांनी पणजीतील झेड स्क्वेअर थिएटरच्या हॉलमध्ये नागरिक-काही संपादक यांच्याशी संवाद साधला. केंद्रीय अर्थसंकल्प देशासह गोव्याला कसा फायदेशीर ठरणार आहे यावर प्रसाद यांनी विवेचन केले. अर्थसंकल्पाशी निगडीत असलेल्या विविध मान्यवरांशी-उद्योजक, व्यापारी अशा वर्गासोबत त्यांनी वार्तालापही केला.









