Pune News : बाबासाहेब पुरंदरेंचं स्वप्न आज सत्यात उतरलंय.’छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आजही काश्मीर ते कन्याकुमारी आणि द्वारका ते कलकत्तामधील लोकांना प्रेरित करत आहे. गुजरातमध्ये नरेंद्र मोदींनी जाणता राजा नाटकाचे 8 जिल्ह्यात प्रयोग दाखवले, त्यावेळी गुजरातचे लोक नाटक बघायला यायचे आणि शिवाजी महाराजांचे भक्त होऊन जायचे अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी दिली. शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते.
Previous Articleराष्ट्रीय डान्स चॅम्पियनशिप मध्ये मराठी लावणीची सुंदर कोरिओग्राफी केल्याबद्दल उत्कर्षा मळीक हिला गोल्ड मेडल
Next Article चार राज्यातून दोडामार्गची कन्या द्वितीय








