कोल्हापूर प्रतिनिधी
केंद्रीय आरोग्य आरोग्य राज्यमंत्री भारती पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी सीपीआर रुग्णालयात आढावा बैठक घेतली. या आढावा बैठकीत त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांसह डॉक्टरांना फैलावर घेतले. प्रत्येकाला शहरातच काम करायचे आहे मग ग्रामीण भागातले काम कोण करणार? मशीन आहे पण डॉक्टर नाही अशी परिस्थिती सीपीआर रुग्णालयातील आहे.डॉक्टर नसतील तर रोटेशन लावा. 70 साल पुराना जमाना अभी नही रहा. या शब्दात केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर आगपाखड करत फैलावर घेतले.
या आढावा बैठकीला राज्यसभा खासदार धनंजय महाडिक देखील उपस्थित होती. गरिबांची सेवा करायला डॉक्टर होतो पण डॉक्टर झालो की हे विसरून जातो. या शब्दात पवार यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना सुनावले. जर डॉक्टर नसतील तर त्याचे रोटेशन लावा. प्रत्येकाने शहरात थांबायचे मग ग्रामीण मधील काम कोण करणार? असा सवाल देखील पवार यांनी केला.
माता मृत्यू आणि बालमृत्यू रोखायचे असेल तर तुमचा निष्काळजीपणा कसा चालेल. मी इथून जायच्या आधी मला डॉक्टरांचे रोटेशन लावून दाखवा. असे खडे बोल सुनावत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार ह्या चांगल्याच वैद्यकीय अधिकाऱ्यांच्यावर भडकल्या.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








