केएससीए चषक ए डिव्हीजन क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यता प्राप्त धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित केएससीए चषक ए डिव्हीजन क्रिकेट स्पर्धेत रविवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात युनियन जिमखानाने बेळगाव स्पोर्ट्सचा 3 गड्यांनी पराभव 4 गुण मिळविले. 4 गडी व 59 धावा करणाऱ्या तनिष्क नाईकला सामनाविर पुरस्कार देण्यात आला. अॅटोनगर येथील केएससीए स्टेडियमवर खेळविण्यात आलेलया सामन्यात बेळगाव स्पोर्ट्स क्लबने प्रथम फलंदाजी करताना 47.4 षटकात सर्व गडीबाद 194 धावा केल्या. त्यात काविश मुक्कण्णवर व विजयकुमार पाटील यांनी 4 चौकारांसह प्रत्येकी 34, पार्थ पाटीलने 2 षटकार 2 चौकारासह नाबाद 33, आर्यन पुंदप व सिद्देश असलकर यांनी प्रत्येकी 23, सुदीप सातेरीने 19 धावा केल्या. जिमखाना तर्फे तनिष्क नाईकने 38 धावांत 4, वैष्णव संघमित्रने 2 तर यश, आर्यान, वैभव,ऋतुराज यानी प्रत्येकी 1 गडीबाद केले. प्रत्युतरादाखल खेळताना जिमखानाने 47.5 षटकात 7 गडीबाद 198 धावा करून सामना 4 गड्यांनी जिंकला. त्यात तनिष्क नाईकने 1 षटकार 10 चौकारासह 59, अमय भातकांडेने 2 षटकार 5 चौकारासह नाबाद 58, ऋतुराज भोटीने 25, आर्यान इंचलने 18 धवा केल्या.बेळगाव स्पोर्ट्स क्लब तर्फे पार्थ पाटीलने 38 धावांत 4, तर राकेश,विजय, स्वप्नील यांनी प्रत्येकी एक गडीबाद केले.









