विश्रुत चिट्स चषक क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : युनियन जिमखाना आयोजित विश्रुत चिट्स प्रायव्हेट लिमिटेड पुरस्कृत विश्रुत चिट्स चषक 13 वर्षाखालील मुलांच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात युनियन जिमखाना संघाने बेंगळूरच्या क्रिक लाईफ संघाचा 97 धावानी पराभव करीत 2-0 अशी आघाडी मिळवली. शाहरुख धारवाडकरला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. जिमखाना मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात युनियन जिमखाना संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात सर्व गडी बाद 216 धावा केल्या. त्यात शाहरुख धारवाडकरने 6 चौकारांसह 47, अतिथी भोगणने 31, मोहम्मद अब्बासने 23, विश्रृत कुंदरनाडने 20, अनिश तेंडुलकरने 18 धावा केल्या. क्रिक लाईफ संघातर्फे अश्विन कुमार व कार्तिक आर. यांनी प्रत्येकी 3, हिंदूश्री हिने 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना क्रिक लाईफ बेंगळूर संघाचा डाव 39.5 षटकात सर्व गडी बाद 119 धावात आटोपला. त्यात धनिक कुमारने 26, प्रवीण कुमारने 12, हरी माधव व माहीन यांनी प्रत्येकी 11 धावा केल्या. युनियन जिमखानातर्फे सलमान धारवाडकर व विश्रृत कुंदरनाड यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.









