Union Budget 2023: यापुढे देशात पॅनकार्ड हे ओळखपत्र म्हणून ओळखले जाणार असल्याची घोषणा आज देशाचा अर्थसंकल्प मांडताना आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केली. त्यामुळे यापुढे केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आधार कार्डाची गरज भासणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पॅन कार्डचा वापर सरकारी संस्थांच्या सर्व डिजिटल प्रणालींमध्ये समान ओळख म्हणून केला जाणार आहे. केंद्र सरकारच्या निर्णयानंतर केवायसीची प्रक्रिया पॅनकार्डद्वारेच पूर्ण केली जाईल.
सर्व शासकीय कार्यालयात आता एकमेव ओळखपत्र म्हणून पॅन कार्ड वापरता येईल. सध्या एकाच प्रकारची माहिती वेगवेगळ्या स्वरूपात द्यावी लागते, यापासून आता सुटका मिळणार आहे.ही प्रोसेस सोपी करण्यासाठी युनिफाइड फायलिंग प्रोसेस हे एकच पोर्टल सरकारकडून सुरू करण्यात येईल अशीही घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे.
पॅनकार्ड कोठे होतो वापर
आयकर विभागाकडून पॅनकार्ड जारी केले जाते.पॅनकार्ड काही गोष्टींसाठी बंधकारक असेत. जसे इनकम टॅक्स रिर्टन, म्युचअल फंड गुंतवणूक,लोन अर्जासाठी पॅनकार्ड लागते. बॅंक अकौंट काढताना,व्यवसायाची नोंदणी करताना,अनेक आर्थिक कामांसाठी पॅन कार्डची माहिती आवश्यक असते.
Previous Articleसर्वजन हिताय असा हा अर्थसंकल्प…साखर उद्योगाला सगळ्यात मोठा फायदा मोदी सरकारने दिला- देवेंद्र फडणवीस
Next Article पुणे-सोलापूर महामार्गावरील अपघातात 4 ठार









