Union Budget 2023-24 गुजरात (Gujrat) मध्ये 150 जास्त सीट्स मिळवण्यासाठी महाराष्ट्रातून उद्योग आणि व्यवसाय गुजरातला पळवणाऱ्या सरकारने या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या (Maharashtra) जखमेवर मीठ चोळले आहे. मुंबईला आणि महाराष्ट्राला दिल्ली समोर या बजेटच्या माध्यमातूनही झुकवले आहे असे मत शिवसेना नेते आणि माजी मंत्री आदित्य़ ठाकरे ( Aditya Thakre ) यांनी व्यक्त केले. अर्थमंत्री निर्मला सितारमन (Nirmala Sitaraman) यांनी आज लोकसभेत देशाचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाची >>>> एकनाथ शिंदेंची म्हणाले, गरिबांना आधार देणारा अर्थसंकल्प
पुढे बोलताना ते म्हणाले, “भाजप (BJP) सरकारने गुजरात मध्ये 150 पेक्षा जास्त जागा आणण्यासाठी महाराष्ट्रातील अन्क उद्योगधंदे, प्रकल्प गुजरातला नेले आहेत. अर्थसंकल्पामध्ये मोदी सरकारने माहराष्ट्राच्या आणि मुंबईच्या जखमेवर नेहमीच मीठ चोळले आहे. एक्झिट पोलनुसार कर्नाटकामध्ये भाजप पिछाडीवर दिसत असल्याने निवडणुका डोळ्यासोमोर ठेऊनच विशेष तरतूद केली गेली आहे. कर्नाटकात गेली अनेक वर्षे त्यांचेच सरकार असूनही कर्नाटकसाठी एव्हढी तरतूद करण्याची गरज का पडली ? अर्थसंकल्पात दुसर्या कुठल्याही राज्याचा उल्लेख नाही पण कर्नाटकला विशेष सवलत दिली गेली आहे. महाराष्ट्रात ओढताण करून घटनाबाह्य सरकार बनवूनही मोदी सरकारने महाराष्ट्राला काहिच दिले नाही.” असे मत आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.