वारणानगर प्रतिनिधी
कोडोली ( ता पन्हाळा ) येथील गायरान जमिनीवर केलेले अतिक्रमण निष्कासित करणेबाबत मिळकतधारकांना ग्रामपंचायतीने बजावलेल्या नोटीसीला उत्तर देवूनही पुन्हामहसूल विभागा मार्फत नोटीसा बजावणेत आल्याने नागरीकांच्यात तीव्र संताप निर्माण झाला असून अतिक्रमणे नियमीत होईपर्यत निवडणूकावर बहिष्कार घालणेचा निर्णय अतिक्रमणधारकांनी घेतलेल्या बैठकित एकमुखाने घेणेत आला.
कोडोली येथील दत्त मंदिरमध्ये अतिक्रमण धारकांची बैठक आयोजित करणेत आली होती त्यावेळी एकमताने हा निर्णय घेणेत आला . आनंदनगर वैभवनगर साखरवाडी या भागात शासकीय गायरान जमिनी होत्या. या भागातील जमिनीवर १९८० च्या सुमारास शासनामार्फत गरीब व बेघर लोकांना इंदिरा घरकूल योजनेअंतर्गत घरे बांधून देणेत आली होती . तर काही गरीब व बेघर नागरीकांना शासनामार्फत व ग्रामपंचायत मार्फत जागा उपलब्ध करुन देणेत आल्या होत्या . महसूल विभागाने दिलेल्या नोटीसीस संघटीत होवून एकत्रीत मोर्चाद्वारे उत्तर देणेत येणार आहे. अनेक मिळकतधारक मयत झालेने त्यांच्या वारसानी शासकीय दरबारी वारस नोंद करुन घ्यावी असे उदय पाटील यांनी सांगितले.
गावठाण हदवाढ करून अतिक्रमण नियमित करणे करीता प्रशासनास भाग पाडणे सह २०१५ पर्यतचे सर्व अतिक्रमणे नियमीत करेपर्यत लढा चालू ठेवणेचा निर्णय या वेळी घेणेत आला. यावेळी अमर भिवाजी पाटील, उदय पाटील, उमेश जाधव, प्रदिप घाटगे, बाळू क्षीरसागर, दिलीप उबाळे, मोहन पाटील, सुनिल पाटील यांच्या सह बहुसंख्य मिळकतधारक उपस्थित होते . यावेळी महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









