अशोकनगर येथील कार्यालयातील अधिकाऱ्यांची तारांबळ
बेळगाव : अशोकनगर येथील महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालयाला महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी अचानक भेट दिली. यामुळे येथील अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. तेथील अस्वच्छता पाहून महानगरपालिका आयुक्तांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली आहे. जनतेच्या कोणत्याही समस्या असतील तर त्यांनी तातडीने सोडवा. कोणत्याही प्रकारची तक्रार आपल्याकडे येवू नये, अशी सक्त ताकीद यावेळी देण्यात आली. कर वसुली जास्तीत जास्त करा, कोणत्याही परिस्थितीत जनतेची प्रलंबित कामे निकालात काढा, असे देखील त्यांनी सांगितले. दररोज किती अर्ज येतात, किती अर्ज निकालात काढले जातात याची माहिती देखील आयुक्तांनी घेतली.









