राहुल गांधी यांचे केंद्र सरकारवर टीकास्त्र
वृत्तसंस्था/ वाराणसी
काँग्रेस नेते राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये पोहोचली आहे. त्यांच्या उत्तर प्रदेश दौऱ्याचा शनिवारी दुसरा दिवस होता. राहुल गांधी यांनी वाराणसीमध्ये न्याय यात्रेदरम्यान लोकांना संबोधित केले. या प्रवासात मी कधीही द्वेष पाहिला नाही, असे ते म्हणाले. यात्रेत भाजप आणि आरएसएसचे लोकही सहभागी झाल्याचा दावा करत देशाला एकत्र आणणे हीच खरी देशभक्ती आहे. आज बेरोजगारी ही देशातील सर्वात मोठी समस्या असून सध्या देशात द्वेष आणि भीतीचे वातावरण आहे, असेही त्यांनी सांगितले. आतापर्यंत यात्रा प्रवास सुरू होऊन 35 दिवस झाले आहेत. या यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी चौथ्यांदा बाबा विश्वनाथ यांच्या दरबारात हजेरी लावली.









