सांगली :
सांगली, मिरज आणि कुपवाड या तिन्ही शहरांना जोडणारा आणि प्रचंड वर्दळीचा चौक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विश्रामबाग चौकात वाहतुकीच्या नियमासाठी आवश्यक ट्रॅफिक सिग्नल, वाहतूक पोलीस आणि मोठा चौक असे सर्व काही आहे. फक्त वाहन चालकांच्या बेशिस्तपणामुळे या चौकातील वाहतुकीचा सातत्याने खोळंबा होतो. सिग्नल लागल्यानंतर गडबडीने वाहने पुढे नेण्याच्या प्रयत्नातच येथे वाहनांचा अनेक छोटे मोठे अपघात होत आहेत. यात वाहतुकीचा दोष उपयोग नाही. वाहन चालकांनीही स्वतः हून शिस्त बाळगण्याची आवश्यकता आहे.
सांगलीतील सर्वात जास्त वाहनांनी ये जा आणि मोठी वर्दळ असणारा मार्ग म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो. त्यात सांगली मिरज हा प्रमुख मार्ग आहे. या मार्गावरून रोज शेकडो वाहने ये जा करतात.
सांगलीच्या मध्यवर्ती बसस्थानकापासून कोल्हापूर रोडकडून मिरजेकडे जाणारी सर्व वाहने याच मार्गाने पुढे जातात. त्याचप्रमाणे मिरजेकडून सांगलीकडे येणारी सर्व वाहनेही याच मागनि शहरात प्रवेश करतात. या सर्व वाहनांना विश्रामबाग चौक पार करावा लागतो.
विश्रामबाग चौकाला सांगली मिरज रोडसह कुपवाड शहर आणि एमआयडीसीकडून आलेला रोड, मंगळवार बाजार, गांधी कॉलनी, लक्ष्मी देऊळ, रेल्वे फाटक, वारणाली, जयहिंद कॉलनी, पोलीस लाईन, मुख्यालय यासह रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला विश्रामबाग परिसरातील अनेक छोटे मोठे रस्ते जोडलेले आहेत. त्यामुळे या चौकात वाहनांची दिवसभर गर्दी असते.
या चौकात चारही बाजूला मिळून किमान तीन ते चार तरी वाहतूक पोलीस नियुक्त केलेले असतात. त्याशिवाय ट्रैफिक सिग्नलही लावण्यात आलेले आहेत. तरीही येथे चार दोन दिवसाला एखादा तरी छोटा मोठा अपघात होतोच.
विश्रामबाग चौकानजीक अनेक व्यापारी व निवासी संकुले, मोठमोठी हॉस्पिटल, दवाखाने, मेडिकल्स, जीम, शाळा, कॉलेज, नाष्टा सेंटर्स, हटिल्स, खाणावळी, भोजनालये, दुध सेंटर, फुल विक्रेते यांची रेलचेल आहे. चौकाच्या एका बाजूला पोलीस मुख्यालय आहे. जवळच पेट्रोल पंप तसेच बसस्टॉप आणि रिक्षाचांबा आहे. त्यामुळे हा चौक दिवसभर फुलून गेलेला असतो.
विश्रामबाग चौक पुर्वर्वीपेक्षा खूपच मोठा झालेला आहे. पण या चौकात विशेषतः रेल्वे उड्डाणपुलाकडून येणारी वाहने अतिशय वेगाने खाली येतात. यातील अनेक वाहनचालक सिग्नल बंद असताना घाईने पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे सांगलीकडून मिरजेकडे जाणारी वाहने आणि पुलावरून खाली आलेली वाहने यांचे येथे अपघात होतात. दुसरीकडे हॉटेल पे प्रकाशच्च्या कोपऱ्याजवळील रस्त्याकडून कुपवाड आणि रेल्वेउड्डाण पुलाच्या दिशेला जाणारे वाहनचालकही अशीच घाईगडबड करतात. त्यामुळे चौकातील आयलैन्डजवळ हमखासपणे अपघात होतात. सिग्नल सुरू झाल्यानंतर रस्ता पार करणारेही अनेक लोक येथे आहेत. त्यातील काहीजण वाहनाना धडकून येथे यापूर्वी अपघात झाले आहेत. चालत जाणारे लोक आणि काही बेशिस्त फेरीवाले आणि विक्रेत्यांनी ठाण मांडलेले वाहन चालकांच्या घाईमुळे येथे छोटे मोठे अपघात होताना दिसत आहेत. याशिवाय या चौकानजिक मागील काही दिवसापासून आहे. हे लोक सिग्नलला थांबणाऱ्या लोकांना काही तरी वस्तु विकण्याचा प्रयत्न करतात. मुळातच सांगलीतील अनेक ठिकाणच्या ट्रैफिक सिग्नलला टायमर नसल्याने कमी वेळेत हे सिग्नल सुरू होतात व लगेच बंद होतात. वाहतूक नियंत्रण होत नाही. शहरातील सिग्ननला टायमर बसविण्याची आवश्यकता आहे.








