मंत्री रवी नाईक यांचे उद्गार : फोंडा मतदार संघासाठी 70 कोटींची योजना
प्रतिनिधी / फोंडा
वीज जोडणीपासून राज्यातील एकही घर वंचित राहणार नाही, याची काळजी सरकार घेत आहे. गोवा राज्यात आरोग्य कायदा असल्याने अगदी खालच्या स्तरातील गरीब कुटुंबापासून परप्रांतीय मजुरापर्यंत सर्वांनाच त्यांच्या मागणीनुसार वीज जोडणी बंधनकारक आहे. राज्याला वीज, पाणी व दूध पुरवठा फोंड्यातून होतो. त्यामुळे फोंड्यातील जनतेला सुरळीत वीज मिळणे गरजे आहे. भूमिगत वीज वाहिन्या जोडणी योजनेतून येत्या सहा महिन्यात फोंडा मतदार संघातील वीज पुरवठ्यात अमुलाग्र सुधारणा होतील, असे उद्गार फोंड्याचे आमदार व कृषीमंत्री रवी नाईक यांनी काढले.
फोंडा मतदार संघासाठी 70 कोटींची योजना
फोंडा मतदार संघासाठी ऊ. 70 कोटी खर्चून हाती घेण्यात आलेल्या भूमिगत वीज वाहिन्या जोडणी योजनेच्या शुभारंभी कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. शांतीनगर-फोंडा येथील यशवंत सभागृहात गुऊवारी सायंकाळी हा कार्यक्रम पार पडला. फोंडा पालिका व कुर्टी पंचायत क्षेत्रासह संपूर्ण फोंडा मतदार संघात भूमिगत वीज वाहिन्यांनी जोडण्याची ही योजना आहे. 110 किलो मिटरचे हे नेटवर्क असून 11 केव्हीच्या आठ फिडरचे भूमिगत केबलिंग व त्याला जोडून असलेल्या साधारण 200 वीज ट्रान्स्फॉर्मरशी जोडणी होणार आहे. येत्या सहा महिन्यात हे काम पूर्ण होणार असून फोंडा शहरासह कुर्टी पंचायत क्षेत्रातील वीज प्रवाहात त्यामुळे सुधारणा होणार आहे.
कार्यक्रमाला व्यासपीठावर माजी खासदार तथा अनिवासी भारतीय आयुक्त अॅङ नरेंद्र सावईकर, नगराध्यक्ष रितेश नाईक, कुर्टी जिल्हा पंचायत सदस्य प्रिया च्यारी, नगरसेविका गिताली तळावलीकर, विश्वनाथ दळवी, शांताराम कोलवेकर, आनंद नाईक, वीज खात्याचे मुख्य अभियंते स्टिफन फर्नांडिस, कार्यकारी अभियंते पी. पी. भरथन, साहाय्यक अभियंते केशव गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
गोव्याच्या विकासासाठी पंतप्रधानांचे विशेष लक्ष
भाजपा सरकारच्या कारकिर्दीत गोव्यात रस्ते, पूल व इतर साधनसुविधांचा विकास जोरात सुऊ आहे. केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार असल्यानेच हे शक्य झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गोव्यावर विशेष लक्ष असून त्यांचे हात बळकट करण्यासाठी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण व उत्तर गोव्यातील दोन्ही जागांवर भाजपाचे उमेदवार निवडून देण्याचे आवाहन रवी नाईक यांनी यावेळी केले.
रवी नाईक व अन्य मान्यवरांच्याहस्ते दीप प्रज्ज्वलीत कऊन व शिलान्यासचे अनावरण कऊन योजनेचा शुभारंभ करण्यात आला. अॅङ नरेंद्र सावईकर म्हणाले, घरोघरी वीज हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न होते. गेल्या नऊ वर्षांत त्याच्या पूर्ततेकडे वाटचाल सुऊ आहे. भूमिगत वीज वाहिन्या जोडणी योजना हे राज्याच्या विकासाच्यादृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विकासाची गती कायम ठेवताना जनतेवर कुठल्याही कराचा बोजा न लादता कल्याणकारी योजनांचा समावेश असलेला राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे.
मंत्री रवी नाईक यांनी मागील कार्यकाळात फोंडा मतदार संघातील वीज पुरवठ्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी विधानसभा अधिवेशनात प्रश्न मांडला होता. तत्कालीन वीजमंत्री निलेश काब्राल यांनी त्याची दखल घेऊन वीज समस्या निकाल काढण्याचे आश्वासन दिले होते. या नवीन योजनेमुळे फोंड्यातील वीज प्रवाह सुरळीत होईल, अशी आशा नगराध्यक्ष रितेश नाईक यांनी व्यक्त केली. प्रिया च्यारी व गिताली तळावलीकर यांनी वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी फोंडा व कुर्टी भागात ही योजना राबविल्याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच भूमिगत केबलिंगच्या कामामुळे थोडी गैरसोय होणार असली तरी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
स्टिफन फर्नांडिस यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात वीज खात्यातर्फे वर्षभरात हाती घेण्यात आलेल्या योजनांची माहिती दिली. वीज ही माणसाची जीवनवाहिनी बनली असून गोमंतकीय जनतेला या योजनेमुळे सुरळीत वीज पुरवठा करण्यास मदत होणार असल्याचे सांगितले. स्वागत केशव गावडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपा मिरींगकर यांनी तर प्रवीण केरकर यांनी आभार मानले.









