आण्विक बंकरचा विचार येताच काळोखयुक्त, थंड आणि भीतीदायक खोल्यांचे चित्र डोळ्यांसमोर उभे राहते. बंकरचा उद्देश युद्धाच्या काळात आण्विक हल्ल्यांपासून वाचविणारी जमिनीखालील गुप्त जागा तयार करणे आहे. ही जागा काही दिवसच नव्हे तर महिन्यांपर्यंत माणसांना तेथे जिवंत राहण्यास उपयुक्त असणे अपेक्षित आहे. परंतु लास व्हेगासमधील हा अनोखा भूमिगत बंकर तुमचा विचारच बदलून टाकेल. 1970 च्या दशकात निर्मित हा मजबूत शेल्टर शीतयुद्धकाळातील भीतीची आठवण करून देतो, तसेच येथील दृश्य आणि सुविधा तुम्हाला अचंबित करतात.
त्या काळात अमेरिका आणि सोव्हियत महासंघामधील तणाव शिगेला पोहोचला होता आणि अनेक अमेरिकन परिवार आण्विक हल्ल्याच्या भीतीने बंकर तयार करवून घेत होते. परंतु ही 75 कोटी रुपयांची प्रॉपर्टी अमेरिकेतील सर्वात असाधारण घरांमध्ये सामील आहे. येथे केवळ जीव वाचविण्याची साधने नव्हे तर त्याच्यासोबत आलिशान जीवनाच्या सुविधाही आहेत.
‘लास व्हेगास अंडरग्राउंड हाउस’ नावाने प्रसिद्ध हा जगातील सर्वात मोठा ‘एटॉमिटॅट’ (एटॉमिक हॅबिटॅटचे शॉर्टफॉर्म) आहे. याला मूळ स्वरुपात एवन प्रॉडक्ट्सचे एक्झिक्यूटिव्ह जेरार्ड हेंडरसन यांनी 1974-78 दरम्यान आर्किटेक्ट जे. स्वेज यांच्याकडून तयार करविला होता. हा बंकर आर्मागेडन (प्रलय)च्या काळात स्टायलिश पद्धतीने जगण्यासाठी निर्माण करण्यात आला होता, असे सांगण्यात येते.
पूर्णपणे आत्मनिर्भर
ग्राउंडवर एक सामान्य दिसणारे घर आहे, जे खालील या गुप्त शेल्टरला लपविते. प्रॉपर्टी सुमारे 1 एकरमध्ये फैलावलेली असून यात एकूण 5 बेडरुम्स, 6 बाथरुम आणि 16,936 चौरसफुट लिव्हिंग स्पेस आहे. हा बंकर जनरेटर, 1000 गॅलन वॉटर टँक, वॉटरफ्रूफ काँक्रिट शेलसोबत पूर्णपणे ‘आत्मनिर्भर’ आहे.
डिझाइन अद्याप तेच
1970 चे मूळ डिझाइन आजही कायम आहे. ग्रीन कार्पेटिंग, मेटालिक वॉलपेपयर, एटॉमिक पिंक-एंड-व्हाइट किचन, सब बार्बी ड्रिमहाउससारखे वाटते. थिएटर, पुटिंग ग्रीन आणि टेरेसही आहे. जेथे तुम्ही वर न जाता आनंद घेऊ शकता, पहिल्या नजरेत ही प्रॉपर्टी काळाला मागे लोटण्यासारखी वाटते, परंतु आकर्षकही वाटते. हे अंडरग्राउंड टाइम कॅप्सूल असून ते प्रायव्हेट इस्टेटला शांती देते, असे लिस्टिंग एजंटर होली एर्कर ऑफ आयएस लक्झरीने म्हटले आहे. मिस्टरबीस्टच्या व्हायरल व्हिडिओत देखील फीचर झालेले हे घर म्युझियम, फिल्म शूटिंग लोकेशन, इव्हेंट वेन्यू किंवा प्रायव्हेट रिट्रीट ठरू शकते. मालक फ्रँकी लुईस यांनी 2014 मध्ये सुमारे 10 कोटी रुपयांमध्ये हे खरेदी केले होते. ते याला प्रायव्हेट इव्हेंट्स, फॅशन शूट्स, वेडिंग्स आणि टूर्ससाठी वापराचे. आता ही प्रॉपर्टी 75 कोटी रुपयांमध्ये विकण्यास तयार आहे.
लक्झरी आहे यातील जीवन
येथे जिवंत राहण्याचा अर्थ केवळ मूलभूत सुविधांसोबत राहणे नसून लास व्हेगास स्टाइल लक्झरी आहे. आत एक इनडोअर पूल असून जेथे ग्रोटो-स्टाइल झरा वाहतो. पार्टी लव्हर्ससाठी डान्स फ्लोयर, फुल बार, मल्टीपल सौनास अणि एक प्रोग्रामेबल फेक स्काय असून जो दिवसरात्रीच्या चक्रात चालतो. 14 सपोर्ट बीम्सला खजूरांच्या झाडांचे रुप देण्यात आले आहे.









