प्रतिनिधी : कुडाळ
सिंधुदुर्गातील 99 टक्के पेक्षा जास्त पदाधिकारी व कार्यकर्ते राष्ट्रवादी कॉग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे आहेत व भविष्यात शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करतील असा विश्वास राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत व नेते प्रसाद रेगे यांनी पत्रकार परिषद सांगितले. राष्ट्रवादीचे क्रियाशील सदस्य असलेले नऊ जण अजित पवार यांच्या बैठकीला उपस्थित राहिल्याने त्यांना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशानुसार निलंबित करण्यात आल्याचे श्री सामंत यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्री सामंत बोलत होते. यावेळी जिल्हा सरचिटणीस भास्कर परब , उपाध्यक्ष बाळ कनयाळकर , कुडाळ तालुका अध्यक्ष शिवाजी घोगळे, जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर, नझीर शेख, साबा पाटकर, युवती जिल्हाध्यक्ष सावली पाटकर, सचिन पाटकर उपस्थित होते.









