सातारा, प्रतिनिधी
Satara News : शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव sataraयांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह वाई येथे अनेक मातब्बरांसह वाई तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश झाला.प्रवेश केलेल्या शिवसैनिकांना योग्य व सामाजिक कामांसाठी पूर्ण ताकद देणार असून, येत्या सर्वच निवडणुकांमध्ये शिवसेनेची वाढलेली ताकद सर्वांना दिसेल’ असे प्रतिपादन जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी केले. तसेच अलीकडच्या काळात वाई तालुक्यातील कार्यकर्त्यांचे नियमित चाललेल्या शिवसेना पक्षप्रवेशाने विरोधकांना लवकरच धक्कातंत्र मिळणार असल्याचेही जाधव म्हणाले.
नुतन पक्षप्रवेशावेळी राजाराम बाबुराव सणस मेनवली,तानाजी कृष्णा सनस उपसरपंच रेणावळे,रामचंद्र गणपती सणस,यशवंत हरी तुपे,आनंदा रामचंद्र जाधव,सुरेश विठ्ठल धोत्रे, संतोष राम पवार,अनिल बाळू पवार,अजय सुरेश धोत्रे,रुपेश यशवंत धोत्रे,अक्षय सुखदेव काटे,अमोल भुजबळ,गणेश सनस,संतोष चव्हाण,गणेश पवार,दीपक भोसले,सुभाष पवार,राहुल चव्हाण,दिलीप चव्हाण,अतुल निंबाळकर,सचिन गायकवाड,विजय गोरे,किशोर कांबळे,अभिजीत कांबळे,मयूर मोहिते,संकेत चव्हाण यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा भगवा ध्वज खांद्यावर घेत प्रवेश केला.
या कार्यक्रमावेळी विकास शिंदे वाई विधानसभा प्रमुख,संदीप पवार उपजिल्हाप्रमुख,योगेश फाळके युवासेना वाई विधानसभा प्रमुख,युवासेना उपजिल्हाप्रमुख प्रणव थोरवे,वाई तालुकाप्रमुख रवींद्र भिलारे युवासेना वाई तालुकाप्रमुख तुकाराम तुपे यांचे सहअनेक पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.यावेळी युवासेनेचे वाई शहरप्रमुख पैलवान किशोर भगत व युवासेना उपशहर प्रमुख रणजित गाडेकर त्यांची नव्याने नेमणूक झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.









