ऑनलाईन टीम/तरुण भारत
शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) शिंदे गटात सामील झाल्यांनतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी कीर्तिकरांच्या खासदारकीच्या राजीनाम्याची मागणी केली होती. दरम्यान, आज संजय निरुपम बाईक रॅली (Bike Rally) काढून राजीनाम्याची मागणी करणार होते. या पार्श्वभूमीवी संजय निरुपमांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. याची माहिती संजय निरुपमांनी ट्विटरवर दिली होती. तसेच पोलीस ठाण्यातून बाहेर आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दबावाखाली मला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा आरोप त्यांनी केला. (Under pressure from the Chief Minister the police detained me Sanjay Nirupam allegation)
कॉंग्रेस नेते संजय निरूपम यांनी पोलिसांनी ताब्यात घेतलं. पोलीस ठाण्यातून बाहेर आल्यानंतर निरूपम यांनी यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी निरुपम यांनी मुंबई पोलीस दबावाखाली काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. पुढे निरुपम म्हणाले की, “आज आम्ही बाईक रॅली काढणार होतो. खासदार गजानन कीर्तिकर आमच्या विभागाचे खासदार आहेत. मागील साडेतीन वर्षांपासून गजानन कीर्तिकर मतदारसंघात फिरकलेले नाहीत. कोणाला भेटलेले नाहीत. त्यानंतर गजानन कीर्तिकर हे पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात म्हणजेच शिंदे गटात गेले. गजानन कीर्तिकरांचा शिंदे गटात जाण्याचा हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आम्हाला त्यामध्ये पडायचे नाही. परंतु, कीर्तिकर हे पैसे घेऊन किंवा ईडीच्या भितीने किंवा कोणती अडचण आहे, म्हणून ते शिदे गटात गेले अशतील तर, तो त्यांचा विषय आहे. पण जो खासदार अडीच ते तीन वर्षांपासून निष्क्रीय आहे, अशा खासदाराला पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा. गजानन कीर्तिकरांकडून राजीनामा मागण्यासाठीच आमची आज बाईक रॅली होती”.
“मला कळेना मुंबई पोलीस एवढे का घाबरत आहेत. मंगळवारी रात्रीपासून पोलिसांनी माझ्या घराखाली पहारा लावलाय. सकाळीही बरेच पोलीस घराखाली होते. आज जिथून आमची बाईक रॅली सुरू होणार होती. तिकडेही पोलिसांच्या १० ते १५ गाड्या होत्या. सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी तिकडे होते आणि त्यांना आमची रॅली अडवायची होती. पण आम्ही त्यांना रितसर परवानगबाबत कागदपत्र दिली होती. तसेच, बाईक रॅलीसाठी परवानगी दिली नाही, तर आम्ही बाईक रॅली सुरू करणार आणि तुम्हाला काय कारवाई करायची असेल ती त्यांनी करावी”, असेही संजय निरुपम यांनी म्हटले.
“आज सकाळी 11 वाजता काही पोलीस माझ्या घरी आले आणि त्यांनी मला वर्सोवा पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले. त्यावेळी माझे अटक वॉरंट तुमच्याकडे आहे का, असा सवाल विचारला. तर त्यांनी मला पोलीस ठाण्यात चला तिकडे आहे असे सांगितले. तसेच, पोलिसांनी घरी आल्यावर मला कोणतेही लेटर न दाखवता ताब्यात घेतले आणि वर्सोवा पोलीस ठाण्यात नेले. चार ते पाच तास मला पोलीस ठाण्यात ठेवले पण एकही कागदपत्र मला दाखवला नाही”, असेही त्यांनी सांगितले. शिवाय पोलिसांनी बेकायदेशीर अटक केल्याचा आरोपही त्यांनी केला