ऑनलाईन टीम / तरुण भारत :
सख्ख्या काकानेच मित्राच्या मदतीने दोन अल्पवयीन पुतणींवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पुण्याच्या भवानी पेठेत घडली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
इरफान आतिक (29) आणि मोहम्मद धोबी (40) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी एका समाजसेविकेने पोलिसात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित दोन्ही मुली अल्पवयीन आहेत. एक 10 वर्षांची तर दुसरी 14 वर्षांची आहे. दोन्ही मुलींचे आई-वडील काही कामानिमित्त दिल्लीला गेले होते. मुली लहान असल्याने त्यांनी या दोघींना काकाकडे राहण्यासाठी पाठवले होते. दरम्यान, घरी असताना काकाने वेळोवेळी या दोन्ही लहान मुलींशी बळजबरी करून शारीरिक संबंध ठेवले. हा नराधम ऐवढय़ावरच थांबला नाही, तर त्याच्या मित्रानेही या मुलींवर बलात्कार केला. जवळपास 20 ते 22 दिवसांपासून हा प्रकार सुरू होता. यामधील एका मुलीने पोटात दुखत असल्याचे शेजारी राहत असलेल्या महिलेला सांगितलं. त्यामधून हा सर्व प्रकार पुढे आला. एका समाजसेविकेने यासंदर्भात पोलिसात तक्रार देताच पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली. खडक पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात बलात्कार आणि पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक वाचा : काँग्रेसचा राज्यात पुन्हा स्वबळाचा नारा









