2025 च्या विम्बल्डन ग्रॅन्डस्लॅम स्पर्धेत शनिवारी ब्रिटनच्या टेनिसपटूंनी पुरुष दुहेरीचे अजिंक्यपद मिळवून आधुनिक टेनिस क्षेत्रात नवे दालन उघडले. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत पहिल्यांदाच ब्रिटनच्या टेनिसपटूंनी पुरुष दुहेरीचे अजिंक्यपद पटकाविले. ब्रिटनच्या ज्युलीयन कॅश आणि लॉईड ग्लासपूल यांनी ऑस्ट्रेलियाच्या रिंकी हिजीकेटा आणि हॉलंडच्या डेव्हिड पेलचा अंतिम लढतीत पराभव केला.
पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात कॅश-ग्लासपूल या जोडीने हिजीकेटा व पेल यांचा 6-2, 7-6 (7-3) अशा सरळ सेट्मध्ये पराभव केला. हा अंतिम सामना 85 मिनिटे चालला होता. ब्रिटनच्या कॅश आणि ग्लासपूल या जोडीचा दुहेरीतील हा सलग 14 वा विजय आहे.









