वेंगुर्ले पोलीसांकडून सापळा रचून कारवाई
वेंगुर्ले (वार्ताहर)-
अणसुर-वादळवाडी येथील मंगेश भिकाजी गावडे हे राहत्या घराच्या पाठीमागे विनापरवाना काडतूसची बंदुक घेवून शिकारीसाठी फिरत असल्याच्या मंगळवारी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार वेंगुर्ले पोलीस निरीक्षक अतुल जाधव तात्काळ पोलीस पथकासह घटनास्थळी जात सापळा रचून धाड टाकली. या धाडीत अनधिकृत बंदुक व काडतुसे जप्त करण्यात आली . आरोपीवर भारतीय हत्यारबंदी कायदा अधिनियम 3/25 अन्वये गुन्हा वेंगुर्ले पोलीसांत दाखल झाला आहे.
अणसुर वादळवाडी येथील मंगेश भिकाजी गावडे हे राहत्या घराच्या पाठीमागे विनापरवाना काडतूसची बंदुक घेवून शिकारीसाठी फिरत असल्याच्या मिळालेल्या गोपनीय माहिती पोलीसांना मिळताच पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार रंजिता चौहान, पोलीस हवालदार विठ्ठल धुरी, अमर कांडर, पांडुरंग खडपकर, सुरेश पाटील या पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी रवाना होत सापळा रचून मंगळवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारांस हि कारवाई केली.
या कारवाईत सदर आरोपीत याच्याकडून अनधिकृत बंदुक व त्यातील जिवंत काडतूस जप्त केलेले आहे. या प्रकरणी आरोपीवर सदरची कारवाई ही पोलीसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.









