सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी
मुंबई-गोवा महामार्गालगत ओरोस येथे असलेले अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले असून नॅशनल हायवे ऑथॉरिटी यांनी अब्दुल हमीद सबुराती यांच्या मालकीच्या गादी कारखान्यावर कारवाई केली आहे.हायवे लगत अनधिकृत बांधकाम काढून टाकण्यासाठी नोटीस देवूनही ते न हटवल्यामुळे अखेर कारवाई केली आहे. पोकलेन व जेसीबीने अनधिकृत बांधकाम पाडून इमारत जमिनदोस्त केली आहे.कोकण गादी कारखाना व स्टील फर्निचर दुकानावर पोलीस बंदोबस्त व महसूल खात्याच्या मदतीने नॅशनल हायवे ऑथॉरिटी कडून कारवाई करण्यात आली .









