प्रतिनिधी /बेळगाव
बेंगळूर येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात 1995 नंतरच्या शाळा व महाविद्यालयांना अनुदान देण्यासंदर्भात बुधवारपासून आंदोलनास सुरुवात झाली. गुरुवारी या आंदोलनाचा अंतिम निर्णय होऊन एक सकारात्मक निर्णय मिळण्याची आशा आहे, असे माजी शिक्षणमंत्री व विद्यमान विधानपरिषद सदस्य बसवराज होरट्टी, मरितिप्पे गौडा, संकनूर बोजेगौडा, शशिल नमोशी, हणमंत निराणी, के. टी. श्रीकंठेगौडा यांनी आश्वासन दिले. याशिवाय इतर सर्व विधानपरिषद सदस्यांनी देखील ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
या आंदोलनाला राज्यभरातून विनाअनुदानित शिक्षकांनी आपली उपस्थिती मोठय़ा संख्येने दाखवलेली आहे. बेळगाव जिल्हय़ातील प्रत्येक तालुक्मयामधून शिक्षक आंदोलनात सहभागी झाले आहेत. या आंदोलनात बेळगाव जिल्हा विनाअनुदानित शिक्षक संघटनेचे अध्यक्ष मारुती अजानी, उपाध्यक्ष मारुती कंग्राळकर, सचिव प्रा. सुरेश कांबळे, सदस्य मिलिंद मंत्रेशी आणि एकनाथ मास्ती, मलिकार्जुन दोडवाड, महेश हगीदाळे, गंगाधर काळचरंतीमठ उपस्थित होते.









