कोल्हापूर :
शहरातील शाहुपूरी पोलिसांनी संशयास्पद थांबलेल्या चारचाकी गाडीची तपासणी केली असता, त्या चारचाकीमध्ये 1 कोटी 98 लाख 99 हजार 500 ऊपयांची बेहिशोबी रोकड आढळून आल्याने, ही रोकड जप्त करीत, चारचाकी गाडीसह दोघा तऊणाना ताब्यात घेतले आहे. किरण हणमंत पवार (रा. देवापूर, ता. माण, जि. सातारा), त्याचा साथिदार आण्णा सुभाष खडतरे (रा. केळकर हॉस्पीटलनजीक, खडतरे गल्ली, सांगोला, जि. सोलापूर) अशी त्याची नावे आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आणि आयकर विभागाने सखोल चौकशी सुऊ केली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली.
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जिल्हा पोलीस दलाने जय्यत तयारी केली असून, शहरात कोठेही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी शहरात पोलिसांची गस्त वाढविली आहे. शुक्रवारी रात्री शहरातील शाहुपूरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल मुळे, पोलीस उपनिरीक्षक संजीव बंबरगेकर, wवालदार तानाजी चौगले, दयानंद पाटील, चंद्रशेखर बांटूगे, कॉन्स्टेबल दिगंबर कुंभार, रत्नदिप जाधव आदीचे पोलीस पथक पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालीत होते. यावेळी या पथकाला नागाळा पार्कमधील पाटलाचा वाडा हॉटेलच्या मागे एक चारचाकी गाडी उभी असल्याची दिसली. त्यामुळे पोलिसांनी त्या गाडीकडे धाव घेतली. त्यावेळी त्यांना दोन तऊण गाडीच्या पुढच्या बाजूच्या सिटवर बसल्याचे दिसून आले. त्याना गाडीच्या दरवाज्याच्या काचा खाली करण्यास सांगितले. दरवाज्याच्या काचा खाली करताच, पोलिसांनी गाडीत डोकावऊन पाहिले. त्यावेळी त्यांना गाडीत पैश्याचे बंडच्या बंड असल्याचे आढळून आले.
गस्ती पथकातील पोलिसांनी या प्रकाराची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्यासह आयकर विभागाला देवून, रोकड असलेल्या चारचाकी गाडीसह त्या दोघा तऊणांना पोलीस ठाण्यात आणले. आयकर विभागाचे आयकर निरीक्षक अविनाश पंढरपूरकर आणि विनयकुमार दुबे त्वरीत शाहुपूरी पोलीस ठाण्यात आले. त्यांनी चार चाकीमधील रोकड ताब्यात घेवून, त्याची मोजणी सुऊ केली. मोजणीअंती ही रोकड 1 कोटी 98 लाख 99 हजार 500 ऊपये असल्याचे उघड झाले. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या किरण पवार आणि त्याचा साथिदार आण्णा खडतरे या दोघाकडे इतकी मोठी रोकड कोठून आणली. ती कोणाला देण्यात येणार होती. याबाबत कसून चौकशी सुऊ केली आहे. चौकशीमध्ये दोघा संशयितांनी ठोस अशी माहिती न दिल्याने, ही रोकड बेहिशोबी असल्याचे उघड झाल्याने, आयकर विभाग आणि पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुऊ केली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली.
सोने व्यवहारामधील रोकड
शाहुपूरी पोलिसांनी सुमारे दोन कोटी ऊपयांची बेहिशोबी रोकड जप्त करीत, किरण पवार आणि त्याचा साथिदार आण्णा खडतरे या दोघांना शनिवारी रात्री उशिरा अटक कऊन चौकशी सुऊ केली. चौकशीमध्ये या दोघांनी जप्त केलेली बेहिशोबी रोकड ही सोने व्यवहारामधील असल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. पण हा सोन्याचा व्यवहार कोणा व्यक्तीच्यामध्ये होणार होता. यांची माहिती देण्यास मात्र पोलिसांनी तपासाच्या नावाखाली नकार दिला.
पाचशे, दोनशे रुपयांच्या नोटाचे बंड
पोलिसानी बेहिशोबी सुमारे दोन कोटी ऊपयांची रोकड जप्त केले आहे. या रोकडीची मोजदात करण्यात आली. त्यावेळी या रोकडीमध्ये 500, 200 ऊपयाच्या नोटाचे बंडच्या बंड आणि एकच 100 ऊपयांचा बंड आढळून आला, अशी माहिती पोलिसांनी दिली.








