सना :
येमेनमधील हुती बंडखोरांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या कार्यालयांवर हल्ला करत तेथील युएनच्या 11 कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवले आहे. इस्रायलने येमेनवर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर हुती बंडखोरांनी राजधानी सना आणि बंदर शहर हुदेदामधील युएनच्या कार्यालयांवर हल्ले केले आहेत. इस्रायलच्या हल्ल्यात हुती बंडखोरांच्या पंतप्रधानांसह अनेक वरिष्ठ कमांडर मारले गेले होते. यामुळे संतापलेल्या हुती बंडखोरांनी आता आंतरराष्ट्रीय संस्थेलाच लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.









