ऑनलाईन टिम / मुंबई
घटनेची तथ्ये तपासणारी वेबसाइट Alt News चे सह-संस्थापक झुबेर यांना सोमवारी दिल्ली पोलिसांनी अटक केली. त्यांच्य़ावर धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली त्याला अटक केली आहे.
संयुक्त राष्ट्र प्रमुख अँटोनियो गुटेरेस यांच्या एका प्रवक्त्याने दिल्लीतील Alt न्यूजचे सह-संस्थापक मोहम्मद झुबेर यांच्या अटकेसंदर्भात हे मत व्यक्त केले. ते म्हणाले “पत्रकार जे लिहितात, ट्विट करतात, आपली मते व्यक्त करतात त्याबद्दल त्यांना तुरुंगात टाकणे चुकीचे आहे. कोणत्याही धमकीशिवाय स्वत: ला मुक्तपणे व्यक्त करण्यासाठी या लोकांना परवानगी देणे गरजेचे आहे.
अल्ट न्यूज ही एक फॅक्ट चेकिंग म्हणजेच घटनेची तथ्यता तपासणी करणारी वेबसाइट आहे. झुबेर हे अल्ट न्यूजचे सह-संस्थापक आहेत. त्यांना दिल्ली पोलिसांनी सोमवारी त्यांच्या सोशल मिडीयाच्या माध्यमातून धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे.