सावंतवाडी प्रतिनिधी
सावंतवाडी जयप्रकाश चौक येथील घड्याळ दुकानाचे मालक आणि भाजप कार्यकर्ते उमेश साळगावकर (वय 51 ) यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. गेले काही महिने ते कोल्हापूर येथे खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते.खासदार नारायण राणे यांचे कट्टर समर्थक होते. त्यांच्या पश्चात पत्नी ,एक मुलगी ,भाऊ ,बहीण असा परिवार आहे. त्यांच्या अकस्मित जाण्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे .









