आंब्याच्या नव्या जातीची निर्मितीसाठी कृषी महोत्सवात गौरव : जमिनी विकू नका…शेती बागायतीने फिकवा
प्रेमानंद शिरोडकर /माशेल
जमीन विकायची नसते….. ती पुढील पिढीसाठी राखून ठेवायाची असते. कबाडकष्टाने कसायची असते असे डोंगरमाथ्यावरील भागातील खडकाळ परिसर हिरवळीत ऊपांतर केलेले प्रगतशील शेतकरी उमेश गावकर समस्त गोमंतकीयांना सांगत आहे. नुकत्याच फोंडा येथे झालेल्या राज्यस्तरिय कृषी मेळाव्यात त्यांनी तयार केलेल्या आंब्याच्या नव्या जातीच्या कलमाला मिळालेल्या भरघोस पिकासाठी त्यांचा गौरवही करण्यात आला. काजू, आंबा, खडकाळ जमिनीत अननसाचे पिक, दोडगी, सभोवताली कोकमी कलमे घालून डोगर परिसर हिवागार केला आहे. तिवरे येथील उमेश गावकर यांनी घरापाठीमागे असलेल्या डोंगरमाथ्यावर वडिलोपार्जित आठ हजार पाचशे चौ. मिटर जागा तशीच पडून होती. एके दिवशी त्याने पडीक जमिन हिरवीगार करायचा संकल्प घेत झाडेझुडपे मोठे दगड साफ करायला सुरूवात केली. प्राथमिक तत्वावर पावसाळी पिक घेतल्यानंतर काजूची रोपटी लावण्यास सुरूवात केली. उन्हाळ्यात त्या रोपट्यांना पाण्याची आवश्यकता भासू लागल्याने डेंगर चढून डोक्यावर पाणी वाहून साधारण दोनशे ते काजूची झाडे उभी केल्याचे ते मोठ्या अभिमानाने सांगतात. त्यानंतर आंब्याची कलमे लावण्यास सुरूवात केली आहे. आज आंब्याची झाडे ही या डेंगरावर वाढू लागली असून येत्या काळात बऱ्यापैकी उत्पन्न मिळणार आहे.
उमेश गावकरने बनविले आंब्याच्या नवीन जातीचे कलम
गेल्या सातवर्षापूर्वी उमेश गावकर यांनी स्वत: आंब्याचे कलम तयार केले व पाणी, खत घालून त्याची वाढ केली. या हंगामात त्या झाडाला सुमारे 200 हून अधिक फळे लागली होती. कुर्टी फोंडा येथे झालेल्या कृषी मेळाव्यात हे आंबे प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. समारोप सोहळ्dयाला उत्कृष्ट शेतकरी म्हणून त्यांचा गौरवही करण्यात आला. त्यांनी तयार केलेल्या कलमालाचे नामकरण अजून करण्यात आलेले नसल्याची माहिती दिली. खडकाळ जागेत काजू, आंब्या शिवाय अनेक वनौषधी झाडे लावली आहेत. मसाल्dयाच्या झाडाचे पीक मार्केटमध्ये नेण्यास त्यांनी सुऊवात केली आहे. औषधी झाडानांही मोठ्या प्रमाणात मागणी येऊ लागल्याचे सांगतात. झाडांची मुळे, पाने, साली न्यायला झाडापाल्याचे औषध देणारे येऊ लागले आहेत. कोकमची झाडे, त्याचप्रमाणे हंगामी पालेभाज्या, फळझाडांचे उत्पन्नही ते घेतात.
खडकाळ जमिनीत अननस पिकाचा प्रयोग
खडकाळ जमिनीतील शंभर चौरस मिटर जागेत अननसाच्या पिकाचा प्रयोग केला. कबाडकष्टानंतर अननसाचे उत्पन्न मिळाले परंतु गवे रेड्यानी अननसाची बाग उध्वस्त केली. थोडीच अननसाचे फळे मिळाली इतर फळे उध्वस्त झाली. त्यानंतर याच डेंगरावर त्यानी पावसाळी हंगामी दोडगी, काकडी, कोकणदुदी, बेंडी, पाले भाजी लावून उत्पन्न तयार केले आहे. गावठी भाजीला खपही बऱ्या प्रमाणात आहे. जंगली जनावरांपासून रात्रीच्यावेळी पिक सुरक्षित ठेवण्यासाठी आसरा (खोप) उभारून रातपाळीचे जागरणही केल्याचे ते सांगतात. सरकारकडून सोलार पुंपणासाठी अनुदान मिळते असे मला माहीत पडल्यावर सोलार फॅन्सींग (कुंपण) करण्याचे ठरवून अवघ्या काही दिवसांनी अडीच लाख रूपये खर्चुन सध्या कुंपण घालण्यात आलेले आहे. अजूनपर्यंत सरकारकडून अनुदानाचे पैसे मिळाले नाही. सोलार कुंपण घातल्याने रानटी जनावरांच्या उपद्रव कमी झाला आहे. आता मी मोठ्या प्रमाणात अननसाचे पीक घेणार त्याचप्रमाणे भाजीच्या मळाही फुलविणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.
भरघोस पिकासाठी विहिरीची आवश्यकता
भाजी व अन्य पिकांच्या लागवडीसाठी पाणी खालून वर नेणे कठीण काम आहे. थोड्याच दिवसात विहीर खोदकामाला सुरूवात करणार आहे. ज्यामुळे पंप बसवून व्यवस्थितरित्या भाजीच्या मळ्याला व अन्य आवश्यकता असलेल्या झाडांना पाणी घालता येईल. पाणी मिळाल्यास उत्पन्नातही चांगली वाढ होणार असल्याचे त्यांनी सांगितले. निवृत्तीनंतर पूर्णवेळ शेतीकाम करण्याचा त्यांचा संकल्प आहे. दोन तीन वर्षे कामाची राहिलेली आहे. बागायतीची फळे मला मिळत नसली तरी माझ्या मुलांना ते उत्पन्न मोठया प्रमाणात मिळेल. आज माझ्या या कामात पत्नी व दोन मुले फावल्या वेळेत सहकार्य करीत असतात. डोंगरमाथ्यावर कबाडकष्टाने फुलविलेले हिरवीगार झाडे मोठी झालेली पाहून मन तृत्प झाल्याचे ते सांगतात.









