उंब्रज/प्रतिनिधी
Satara Accident News : उंब्रज ता.कराड येथे पोलीस ठाण्या नजीक असणाऱ्या भरावपुलमार्गाखाली कार व दुचाकी यांच्यात धडक होऊन झालेल्या अपघातात महिला गंभीर जखमी झाली असून अन्य दोघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. शनिवार (दि-8) रोजी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.दरम्यान, जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, उंब्रज ता.कराड येथील पोलीस ठाण्यात नजीक असणाऱ्या शुभम पेट्रोल पंपा समोरील भरावपुलाखाली दुचाकी व मारुती झेन कार यांच्यात धडक झाली. या धडकेत कार भराव पुलाखाली पलटी झाल्याने कार मधील महिला गंभीर जखमी झाली आहे. सुदैवाने या कारमधील इतर लोक व लहान मुलगा बचावला आहे.तसेच या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाली आहे. मोठा आवाज झाल्याने घटनास्थळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली.
पोलीस ठाण्याजवळच हा अपघात झाल्याने उंब्रज पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना कारमधून बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात पाठवले. दरम्यान, या अपघातात महिलेस गंभीर दुखापत झाली आहे. मात्र जखमींची नावे समजू शकली नाहीत. घटनास्थळी पोलिसांनी नागरीकांच्या मदतीने पलटी झालेली कार बाजूला घेतली.
Previous Article‘जुने’ अडगळीत, ‘नवीन’ व्यासपीठावर ! भाजपच्या समन्वय समितीच्या बैठकीत जुन्या कार्यकर्त्यांची खंत
Next Article दिल्ली कॅपिटल्सचा सलग तिसरा पराभव









