जत प्रतिनिधी
जत तालुक्यातील उमदी येथील निखिल नागेश कोळी यांने वेटलिप्टींग स्पर्धेमध्ये सुवर्णपदक तर उमाश्री कट्टे हीने रजत पदक मिळविले असुन दोघांचीही अरुणाचल प्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
एम.व्ही.हायस्कुल अँन्ड ज्युनिअर कॉलेज उमदी येथे शिकत असलेल्या निखिल नागेश कोळी या खेळाडूंने संभाजीनगर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय वेटलिप्टींग स्पर्धेमध्ये ५५ किलो वजन गटात २०३ किलो वजन उचलुन सुवर्णपदक पटकावले. तर उमाश्री परशुराम कट्टे हीने ४० किलो वजनगटात १०० किलो वजन उचलुन रजत पदक पटकावले. अरुणाचल प्रदेश या ठिकाणी होणाऱ्या राष्ट्रीय वेटलिप्टींग स्पर्धेसाठी वेटलिप्टर निखिल कोळी व उमाश्री कट्टे यांची निवड करण्यात आली आहे. क्रीडा शिक्षक संजय नांदणीकर यांनी वेटलिप्टर निखिल कोळी व उमाश्री कट्टे यांना प्रशिक्षण दिले आहे.
वेटलिप्टींग मध्ये सुवर्णपदक व रजत पदक पटकावल्याने प्रशालेच्या वतीने प्रशिक्षक संजय नांदणीकर, खेळाडू निखिल कोळी व उमाश्री कट्टे यांचा सत्कार करण्यात आला. एम.व्ही.हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज चे प्राचार्य एस.सी.जमादार, उपप्राचार्य डी.सी.बासरगांव, उपमुख्याध्यापक सी.एस.धायगुडे, पर्यवेक्षक एम.बी.शिंदे यांचे खेळाडू निखिल कोळी व उमाश्री कट्टे यांना मार्गदर्शन मिळाले. वेटलिप्टींग मध्ये यश संपादन केल्याने प्रशिक्षक संजय नांदणीकर, खेळाडू निखिल कोळी व उमाश्री कट्टे यांचा सर्वोदय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष महादेवप्पा होर्तीकर, उपाध्यक्ष रेवप्पाण्णा लोणी, सचिव एस.के.होर्तीकर व संस्थेच्या सर्व संचालकांच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेच्या व प्रशालेच्या वतीने खेळाडू निखिल कोळी व उमाश्री कट्टे यांना राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.








