वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
प्रतिष्ठेच्या एफआयएसयू वर्ल्ड युनिव्हर्सिटी चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या उमा महेशने नेमबाजीत सुवर्णपदक पटकावले. पुरुषांच्या 10 मी. एअर रायफल सांघिक नेमबाजीत त्याने हे यश मिळविले.
ऑलिम्पिक पदकविजेता गगन नारंग यांची गन फॉर ग्लोरी अकादमीत प्रशिक्षण घेणाऱ्या 20 वर्षीय उमाने आणखी एका पदकाची भर घातली. याआधी त्याने आयएसएसएफ वर्ल्ड कप आणि आशियाई चॅम्पियनशिपमध्येही सुवर्णपदके पटकावली आहेत. आंध्रप्रदेशमधील विजयवाडा येथील रहिवासी आहे.









