सावंतवाडी प्रतिनिधी
सावंतवाडी खासकीलवाडा येथील केंद्रशाळेच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका उज्वलादेवी भालचंद्र पंडित यांचे वयाच्या 89 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.सावंतवाडी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गेले दोन दिवस त्या आजारी होत्या. मळगाव , ओटवणे या शाळांमध्ये त्यांनी मुख्याध्यापक म्हणून काम केले होते . विद्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणून त्यांची ओळख होती. त्यांचा स्वभाव मनमिळावू ,शांत होता . त्यांना वाचनाची फार आवड होती.त्यांच्या पश्चात विवाहित दोन मुलगे ,विवाहित मुलगी, सुना, नातवंडे ,पतवंडे असा मोठा परिवार आहे. सावंतवाडी व्यापारी संघाचे पदाधिकारी तथा सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे सदस्य अभय पंडित , अमित पंडित, रंजना राजन राणे यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या निधनाबद्दल सामाजिक, राजकीय व्यापारी ,शैक्षणिक आधी क्षेत्रातील विविध मान्यवरांनी शोक व्यक्त केला.









