मुंबई
उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेचा समभाग शुक्रवारी तेजी दाखवत 52 आठवड्याच्या उच्चांकावर पोहचला आहे. शुक्रवारच्या सत्रात बँकेचा समभाग इंट्रा डे दरम्यान 8 टक्के इतका वाढत 61 रुपयांवर पोहचला होता. याआधीच्या सत्रात समभाग 56 रुपयांवर बंद झाला होता. गेल्या 6 महिन्याच्या कालावधीत बँकेने गुंतवणूकदारांना 129 टक्के इतका दमदार परतावा दिला आहे. वर्षाच्या अवधीत पाहता एकंदर 102 टक्के इतका समभाग वधारला आहे.









