वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणचे (युआयडीएआय) सीईओ अमित अग्रवाल यांचा कार्यकाळ नोव्हेंबर 2024 पर्यंत वाढवला आहे. आयएएस अधिकारी अमित अग्रवाल यांचा कार्यकाळ 2 नोव्हेंबर 2023 ते 2 नोव्हेंबर 2024 पर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत वाढवण्यात येत असल्यासंबंधीचे परिपत्रक नुकतेच जारी करण्यात आले. अमित अग्रवाल हे 1993 च्या बॅचचे छत्तीसगड केडरचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी भारत सरकार आणि छत्तीसगड आणि मध्यप्रदेश सरकारमध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. यामध्ये तंत्रज्ञान, वित्त, नवोपक्रम आणि तांत्रिक शिक्षण यासारख्या क्षेत्रांचा समावेश आहे.









