61 व्या हौशी मराठी राज्य नाट्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रथम पुरस्कार : पुणेचे ‘वार्ता वार्ता वाढे’ दुसरे, तर मुंबईचे ‘नात्याची गोष्ट’ तिसरे

पणजी : 61 व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत रसरंग, उगवे, गोवा या संस्थेच्या इनफिल्ट्रेशन या नाटकासाठी प्रथम पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा महाराष्ट्रचे सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी यांनी केली. त्याचबरोबर संपूर्ण स्पर्धेचा सविस्तर निकालही जाहीर केला.‘नाटयसंस्कार कला अकादमी पुणे’ या संस्थेच्या ‘वार्ता वार्ता वाढे’ या नाटकास द्वितीय पारितोषिक आणि ‘चारकोप कल्चरल अँड स्पोर्टस फाऊंडेशन, मुंबई’ या संस्थेच्या ‘नात्याची गोष्ट’ या नाटकासाठी तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. दिग्दर्शन प्रथम पारितोषिक नीलेश महाले (इनफिल्ट्रेशन), द्वितीय पारितोषिक सुरज पारसनीस (वार्ता वार्ता वाढे), तृतीय पारितोषिक नीलेश गोपनारायण (नात्याची गोष्ट ) नेपथ्य : प्रथम पारितोषिक- सचिन गावकर (निर्वासित), द्वितीय तुषार घरत (नात्याची गोष्ट), तृतीय विशाल भालेकर (फ्लाइंग राणी). प्रकाश योजना : प्रथम – नीलेश महाले (इनफिल्ट्रेशन), द्वितीय – प्रशांत सावंत (ऱ्हासपर्व), तृतीय – शंतनु पाटील (जंगल जंगल बटा चला है). रंगभूषा : प्रथम वासुदेव आंब्रे (ऱ्हासपर्व), द्वितीय जयवंत सातोसकर (मिशन व्हिक्टरी), तृतीय – निरंजन मकदूम (जंगल जंगल बटा चला है) संगीत दिग्दर्शन : प्रथम यशराज आवेकर (संगीत दहन आख्यान), द्वितीय पारितोषिक कौस्तुभ शिंदे (बॅलंस शीट), तृतीय अमोघ इनामदार (वार्ता वार्ता वाढे).
उत्कृष्ट अभिनय (पदक)
पुऊष कलाकार : नीलेश भेरे (मिशन व्हिक्टरी), प्रमोद पुजारी (बॅलेंस शीट), प्रवीण नाईक (वार्ता वार्ता वाढे), नीलेश गोपनारायण (नात्याची गोष्ट), श्रेयश अतकर (गटार), प्रथमेश माणेकरी (रक्ताभिषेक), मार्शल कोळेकर (गुलाबाची मस्तानी), किरण जायभावे (इश्क का परछा), दिलीप काळे (चांदणी). स्त्री कलाकार : स्पीतल चव्हाण (निर्वासित), निकिता घाग (फ्लाईंग राणी), अव्देता कुलकर्णी (संगीत दहन आख्यान), डॉ. संस्कृती रायकर (एक रिकामी बाजू), डॉ. वेदिका वाळवे (इनफिल्ट्रेशन), डॉ. दीपलक्ष्मी भट (अंधार उजाळण्यासाठी), सिध्दा आंधळे (जातबोवारी), स्वरदा जोशी (मोक्षदाह), वैष्णवी राजगुडे (समांतर), बकुळ पवने (वृंदावन) अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे : स्त्राr कलाकार : अश्विनी तडवळकर (तेरे मेरे सपने), मेघा पाथरे (ऱ्हासपर्व), रितीका राजे (जंगल जंगल बटा चला है), सुनंदा डिघोळकर (दानव), योगिता सावंत (श्याम तुझी आवस ईली रे). पुऊष कलाकार : अमोघ बुडकुले (एक रिकामी बाजू), मयूर मयेकर (इनफिल्ट्रेशन), जीतेंद्र जाधव (इव्हॉल्यूशन ए क्वेशन मार्क), अथर्व धर्माधिकारी (म्हातारा पाऊस), अभिजित केळकर (आपुलाची वाद आपणासी). स्पर्धेसाठी परीक्षक गोव्याचे ज्येष्ठ रंगकर्मी रवींद्र आमोणकर, श्रीमती संयुक्ता थोरात, वासुदेव विष्णुपुरीकर, राज कुबेर आणि सुरेश गायधनी यांनी काम पाहिले.
गोव्याला पहिल्यांदाच मिळाला परीक्षपदाचा मान

या स्पर्धेत यंदा पहिल्यांदाच गोव्यातील रंगकर्मीला परीक्षक म्हणून कार्य करण्याची जबाबदारी देण्यात आली आणि हा मान गोव्यातील ज्येष्ठ रंगकमी रवींद्र आमोणकर यांना मिळाला. यापुर्वी त्यांनी गोव्यासह महाराष्ट्रातील अन्य अनेक स्पर्धांसाठी परीक्षक म्हणून काम पाहिले आहे. प्राप्त माहितीनुसार या स्पर्धेत चाळीस नाटके सादर करण्यात आली. त्यातील एकवीस नाटके दर्जेदार होती आणि बक्षिसांसाठी चुरस निर्माण झाली होती. अशा या चुरशीच्या स्पर्धेत गोव्याने पहिल्या क्रमांकाचे परितोषिक जिंकून बाजी मारली.









