चेल्सीविरुद्ध रॉड्रिगो, बेन्झेमाचा प्रभावशाली खेळ, माद्रिदचा 5-4 ने ऍग्रिगेट विजय
माद्रिद / वृत्तसंस्था
रॉड्रिगो व करीम बेन्झेमा यांच्या जोरदार कमबॅकच्या बळावर रियल माद्रिदने युफा चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. यापूर्वी, पहिल्या टप्प्यातील लढत 2-3 अशा फरकाने गमवावी लागली असली तरी रियल माद्रिदने 5-4 असा ऍग्रिगेट विजय मिळवत शेवटच्या चारमधील स्थान निश्चित केले.
चेल्सीने मॅसॉन माऊंटच्या गोलमुळे जोरदार सुरुवात केली. त्यानंतर ऍन्टोनी रुडिगेर व टिमो वेर्नर यांच्या अनुक्रमे 51 व 75 व्या मिनिटाला केलेल्या गोलमुळे चेल्सीची आघाडी 3-0 अशी भक्कम झाली. पण, नंतर रॉड्रिगोने 80 व्या मिनिटाला गोल करत आघाडी कमी केली आणि नंतर बेन्झेमाने एक्स्ट्रा टाईममध्ये केलेला लेट गोल निर्णायक ठरला. माद्रिदला ही लढत 2-3 अशी गमवावी लागली असली तरी 5-4 अशा ऍग्रिगेट विजयासह त्यांनी उपांत्य फेरी गाठली.
आता उपांत्य फेरीत रियल माद्रिद संघाची लढत मँचेस्टर सिटी किंवा ऍटलेटिको माद्रिद यांच्यापैकी एकाविरुद्ध होईल.
बायर्न म्युनिचचे आव्हानही संपुष्टात (13 एसपीओ 07-बायर्न म्युनिचला धक्का देणारा व्हिलारेलचा संघ)
अन्य एका लढतीत व्हिलारेलने बायर्न म्युनिचला दुसऱया टप्प्यात 1-1 ने बरोबरीत रोखले आणि 2-1 असा ऍग्रिगेट विजय मिळवत म्युनिचचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणले. बायर्नकडून रॉबर्ट लेवान्डोवस्कीने दुसऱया सत्रात 52 व्या मिनिटाला सामन्यातील पहिला गोल नोंदवला तर व्हिलारेलकडून 88 व्या मिनिटाला सॅम्युएलने बरोबरीचा गोल केला. मागील आठवडय़ात स्पेनमध्ये पहिल्या टप्प्यातील लढतीत 0-1 ने पराभव पत्करावा लागल्यानंतर येथे बायर्नवरच दडपण होते आणि त्यांना ते झुगारुन खेळता आले नाही. व्हिलारेलची उपांत्य फेरीतील लढत लिव्हरपूल किंवा बेन्फिका यापैकी एकाविरुद्ध









