खेड :
प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यासाठी 17 फेब्रुवारी रोजी कोकणमार्गे उडुपी–टुंडला महाकुंभ स्पेशल धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने शुक्रवारी सायंकाळी जाहीर केले. या स्पेशलला 20 डबे आहेत.
01192/01191 क्रमांकाची उडुपी–टुंडला 17 रोजी उडुपी येथून सकाळी 12.30 वाजता सुटून तिसऱ्या दिवशी दुपारी 1 वाजता टुंडला येथे पोहचेल. परतीच्या प्रवासात 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.30 वाजता सुटून तिसऱ्या दिवशी सायंकाळी 6.10 वाजता उडुपी येथे पोहचेल. कोकण मार्गावरील स्पेशल मडगाव, रत्नागिरी, चिपळूण, रोहा, पनवेल स्थानकांवर थांबणार आहे.
- महाराष्ट्रात सर्वच स्थानकांत थांबे द्या
मडगाव येथून महाकुंभ मेळ्यासाठी दोन फेऱ्या सुटल्या होत्या. या गाड्या गोवा सरकारने संपूर्ण भाडे भरून त्यांच्या राज्यातील नागरिकांसाठी सोडल्या असल्यामुळे अन्य राज्यातील प्रवाशांना त्याचा लाभ झालेला नाही. 17 रोजी सुटणाऱ्या महाकुंभ विशेष स्पेशलला महाराष्ट्रातील सर्व तालुक्यात थांबे व समान आरक्षण कोटा देण्याची मागणी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीचे सचिव अक्षय महापदी यांनी केली आहे.








