Kolhapur News : सोमवार दि.31 रोजी उदगाव ग्रामपंचायतच्या सदस्यांची मासिक सभा सरपंच यांनी तब्बल चार महिन्यानंतर बोलावली आहे. मात्र या सभेची ग्रामस्थांनी रंगीत तालीम 29 रोजीच सोशल मीडियावर घेतली.गेले वर्षभर उदगाव ग्रामपंचायतमध्ये राजीनामाचे राजकीय खलबते सुरू आहेत.यामुळे हा प्रश्न जिल्हाधिकारी यांच्याकडे अजूनही प्रलंबित आहे.अनेक भ्रष्टाचार चे आरोप,उपोषण आंदोलन यासाठी झाले.सरपंचावर अविश्वास ठराव सदस्यांचे राजीनामे या कारणाने ग्रामस्थांना पहावयास मिळाले. या सर्व प्रकाराने ग्रामपंचायत मधील ग्रामस्थांचे दैनंदिन कामे,गावचा विकास,कर्मचाऱ्यांचे पगार इत्यादी प्रश्न ठप्प झाले आहेत.
सरपंचांनी ग्रामविकास अधिकारी यांच्या सल्ल्यानुसार सदस्यांची ही मासिक सभा 31 जुलै रोजी बोलावली आहे.ही नोटीस सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्रामस्थांना समजल्यानंतर दिवसभर ग्रामस्थांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून कारभाराचा पाढा वाचला.गावच्या विकासाच्या दृष्टीने ही सभा वादग्रस्त न करता जे प्रश्न प्रलंबित आहेत त्यावर एक मत करा तसेच या सभेचे ऑनलाईन प्रक्षेपण करावे अशीही सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्रामस्थांनी मागणी केली.सदस्य तसेच सरपंचांना ही मागणी मान्य असल्याचेही सोशल मीडियातून समजले. ग्राम विकास अधिकारी यांना याबाबत काय अधिकार आहेत का हे जाणून घेऊन ऑनलाइन थेट प्रक्षेपण करण्याचे सांगितले.
आता सर्वांना प्रतीक्षा लागली आहे की 31 रोजी होणाऱ्या सदस्यांच्या मासिक सभेची.प्रशासन गावाला कायमचा ग्रामसेवक देणार का.सरपंच आणि सदस्य मधील कायदेशीर गुंता सोडणार का? की पुन्हा या प्रश्नासाठी ग्रामस्थांना उपोषण करावे लागणार असे अनेक प्रश्न ग्रामस्थांना लागून आहेत.सर्वांचे लक्ष 31 रोजी होणाऱ्या या सभेकडे लागले आहे.









