सावंतवाडी प्रतिनिधी
जे गेले ते गेले त्याची फिकीर करू नका . तुम्ही कामाला लागा, भविष्यात दिवस आपलेच आहेत. जनता आपल्या सोबत आहे. आपली जनतेशी बांधिलकी ठेवा असे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांना स्पष्ट केले . आपण लवकरच कोकणचा दौरा करणार. त्यावेळी ,सावंतवाडी विधानसभेतील सर्व शिवसैनिकांना पदाधिकाऱ्यांना भेटणार, चर्चा करणार व जनतेशी संवाद साधणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील निष्ठावंत शिवसैनिक व पदाधिकारी श्री ठाकरे यांच्या भेटीला गेले होते. यावेळी मातोश्री येथे झालेल्या भेटीत सर्व शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांची श्री ठाकरे यांनी संवाद साधला. यावेळी ,सर्व शिवसैनिकांना तुम्ही काही चिंता करू नका मी तुमच्या सोबत कायम आहे . तुमच्या समस्या निश्चितपणे सोडवल्या जातील असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी खासदार विनायक राऊत , जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, विधानसभा संपर्कप्रमुख शैलेश परब ,तालुका प्रमुख रुपेश राऊळ ,यशवंत परब , संजय गवस ,उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी ,चंद्रकांत कासार, तालुका संपर्कप्रमुख राजू नाईक, जिल्हा समन्वयक बाळा गावडे ,उपजिल्हा संघटक शब्बीर मणियार, युवा सेना गुणाजी गावडे ,सागर नाणोसकर ,योगेश नाईक, महिलाआघाडीच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









