आॅनलाईन टीम/ तरूण भारत
मुंबई : संभाजीराजे हे स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे ते अपक्ष लढणार आहेत. शिवसेनेने काही सांगण्याचा प्रश्नच येत नाही त्यांच्याकडे 42 मते आहेत. त्यांना अपक्ष लढण्याची इच्छा असेल तर अपक्ष निवडणूक लढवतील. शिवसेनेच्या दोन्ही जागा जिंकेल इतके मते शिवसेनेकडे आहेत आणि शिवसेना या दोन्ही जागा जिंकेल. पक्षप्रमुखांनी ज्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे त्या नावाची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच करतील अशी माहिती शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut)यांनी माध्यमांशी बोलताना दिली. (Rajya Sabha Election Latest Marathi News)
माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांना शिवसेनेने ऑफर दिली होती. मात्र शिवसेनेची आॅफर नाकारत संभाजीराजे काल कोल्हापुरात दाखल झाले. दरम्यान आज सकाळी कुटुंबाशी चर्चा करून त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्यसभेच्या सहाव्या उमेदवारी बद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी सविस्तर चर्चा झाली असून पुढे काय करायचे तेही ठरले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे छत्रपती घराण्याचा सन्मान करतील असा विश्वास व्यक्त केला. यानंतर ते मुंबईला रवाना झाले आहेत. त्यामुळे सहाव्या जागेची कोंडी पक्षप्रमुख नाव जाहीर केल्यानंतर सुटणार आहे.
राज्यसभेच्या सहाव्या उमेदवारावरून राज्यात चर्चांना उधान आले आहे. शिवसेना आपला उमेदवार जाहिर करणार की संभाजीराजे शिवबंधन बांधणार याची उत्सुकता अनेकांना लागली आहे. संभाजीराजे हे मुंबईला रवाना झाले असून, संभाजीराजे यांना शिवसेना पुरस्कृत उमेदवारी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. पक्षप्रमुख आज सायंकाळपर्यंत घोषणा करण्याची जाण्याची शक्यता आहे. दरम्यान कोल्हापुरातून शिवसेना नेते संजय पवार यांना राज्यसभेची उमेदवारी मिळणार अशी चर्चा सुरु आहे. आता ही उमेदवारी कोणाला मिळणार याची प्रतिक्षा आहे.