Uddhav Thackeray News : महाराष्ट्राच्या सत्तासंर्घषाचा निकाल देताना कोर्टाने काल 16 आमदारांच्या अपात्रतेविषयी विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा अस सांगितलं. यावर आता उध्दव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नियम डावलून निर्णय दिल्यास कोर्टात जाऊ, असा इशारा राहुल नार्वेकरांना ठाकरेंनी दिला आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्रात बेबंदशाही माजवण्याचा प्रयत्न सुरू आहे.त्यावर न्यायालयाने परखड उत्तर दिलं आहे.हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेबांनी जिवापाड जपलेली शिवसेना गद्दारांच्या माध्यमातून आपल्या दावणीला बांधण्याचा भाजपचा घाट हा काल सर्वोच्च न्यायलयाने हाणून पाडला. सत्ताधाऱ्यांचा खोटा चेहरा कोर्टा ने उघडा केला. मी त्यांचे आभार मानतो, धन्यवाद देतो.एकूणच या निकालाचा अर्थ काय याबाबत अनेकांनी मतप्रदर्शन केलं. भाजपने फटाके फोडत आनंद साजरा करण समजू शकतो पण, गद्दारांनी काल फटाके वाजवले याचं कारण कळलं नाही असा सवालही त्यांनी केला.
पुढे बोलताना ते म्हणाले की, सध्या महाराष्ट्राची अवहेलना सुरु आहे. ही बदनामी थांबली पाहिजे.अस्तित्वात असलेलं सरकार बेकायदेशीर आहे. मी नैतिकतेला जागून राजीनामा दिला. तसचं आताच्या बेकायदेशीर सरकारनं राजीनामा द्यावा. निवडणूकीला सामोर जाऊया आणि निर्णय जनतेसमोर देऊऩ त्यांचा कौल स्विकारूया, असेही ते म्हणाले. जर इकडे वाकडं झालं किंवा नियम डावलून अध्यक्षांनी निर्णय दिल्यास सर्वोच्च न्यायालयात जाऊ असा इशारा उध्दव ठाकरे यांनी विद्यमान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








