ऑनलाईन टीम/ तरुण भारत
आता यापुढची सारी गणितं सभागृहात बघा. हम हार मानने वाले नहीं. यापुढची रणनीती शरद पवारांच्या सुचनेनुसार ठरणार आहे. याच इमारतीतून मविआचा जन्म झाला, यापुढे इथूनच जिंकणार! मविआ मजबूत आहे. पुढची अडीच वर्ष सरकार चालणारचं असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला.
हेही वाचा- राजेश क्षीरसागरांच्या बंडाने कोल्हापुरात शिवसैनिक आक्रमक
दरम्यान, आमदार फुटीनंतर शिवसेनेत बैठकिचं सत्र सुरु झाले आहे. मुंबईताल सर्व नगरसेवकांना शिवसेना भवनात बोलावलं आहे. आज संध्याकाळी ७:३० वाजता बैठक बोलावली आहे. बंडखोरीनंतर शिवसेना नगरसेवकांच्या बाबतीत सतर्क झाली आहे. मुंबईतील काही नगरसेवक हे शिंदे गटाशी संपर्कात असल्याची माहिती समोर आली होती. शिवसेनेला सोडून एकनाथ शिंदेंच्या गटात सामील झाल्याने स्वत: आता उध्दव ठाकरे आता मैदानात उतरले आहेत. याआधी जिल्हाप्रमुख आणि विभागप्रमुख यांची बैठक घेतली यानंतर आता नगरसेवकांची बैठक बोलावली आहे.









