शिंदे गटानं बंडखोरी करत शिवसेनेला मोठे खिंडार पाडले. पहिले सेनेत फूट पाडली त्यानंतर धनुष्यबाण हे चिन्ह आपलंच असल्याचे त्यांनी म्हटलंय़. या विरोधात शिवसेनेने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलीय. याबाबत आज सुनावणी झाली. निवडणूक आयोगाआधी चिन्हाचा फैसला सरन्यायाधीश रम्मणा करणार आहेत. चिन्हाबाबत १९ ऑगस्टला निवडणूक आयोग निर्णय देणारा आहे तर २२ ऑगस्टला सुप्रीम कोर्ट निर्णय देणार आहे.चिन्हाबाबत कोर्ट निरीक्षणं नोंदवणार असून धनुष्यबाणाबाबात आधी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.
सरन्यायाधीश रमण्णा यांनी आतापर्यंत या प्रकरणात घटना आणि कायद्यांवर बोट ठेवून कठोर निरीक्षणं नोंदवली होती. विशेष म्हणजे रमण्णा यांनी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरून दाखल याचिका घटनापीठाकडे वर्ग करण्याची आवश्यकता आहे का यावरही विचार करत असल्याचं सूचक वक्तव्य केलेलं आहे. त्यामुळे याबाबत ते काय निर्णय घेतात हे पाहावं लागणार आहे.
Previous Articleदापोलीत दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांवर बिबट्याचा हल्ला
Next Article बिपाशा – करणच्या घरी येणार छोटा पाहुणा








