कणकवली : प्रतिनिधी
बेळणे ग्रामपंचायतच्या सरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीत उबाठा शिवसेनेने बाजी मारली. तर सदस्यपदासाठी झालेल्या दोन्ही जागांच्या निवडणुकीत भाजप उमेदवार विजयी झाले.
बेळणें सरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे अविनाश गिरकर 218 मतांनी विजयी झाले. लक्ष्मण चाळके यांना 192 तर विलास करांडे यांना 26 मते मिळाली.
प्रभाग एकमध्ये एका जागेसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपच्या राजेंद्र चाळके यांना 90 तर उदय चाळके यांना 83 मते मिळाली नोटा पाच मते. प्रभाग तीनमध्ये एका जागेसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाच्या सिद्धार्थ तांबे यांना 65 तर विलास करांडे यांना 10 मते मिळाली नोटा तीन मते.
Previous Articleबॉक्सिंगमध्ये गोव्याचे पाच खेळाडू पदकांच्या दिशेने
Next Article व्यवसाय, विक्री परवाना नसल्यास गय नाही









