शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची दै.सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुलाखत घेतली. या मुलाखतीत मी आजारी असताना षडयंत्र रचण्यात आल्य़ाचा आरोप उध्दव ठाकरे यांनी केला. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आलं आहे. यावर एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. उध्दव ठाकरेंची मुलाखत ही फिक्स मॅच होती. त्यामुळे मला लाईव्ह मॅच पाहायला आवडते, असा टोला त्यांनी लगावला. तसेच देशभर सुरु असणाऱ्या काॅग्रेसच्या आंदोलनाकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना त्यांनी अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, सरकारचं समर्थन संपल्यानंतर ४०० जीआर काढण्यात आले. बजेटचा विचार न करता पाचपट पैसे वाटून टाकण्यात आले. हे जर असचं सुरु राहिलं तर सरकारला भट्टा बसेल. म्हणून निर्णय घेण्यात आले आहेत. कोणत्याही व्यक्तीला टारगेट केलं जात नाही. तसेच स्मारकांच्या कामांना स्थगिती दिलेली नाही. विरोधीपक्षनेते अजित पवार यांचे आरोप चूकीचे असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
पूरस्थितीचा आढावा घेतला जात असून सर्व जिल्ह्यांचे सर्वे आमच्याकडे येत आहेत. त्याच्याआधारे योग्य तो निर्णय घेवू असं त्यांनी सांगितलं.अजित दादांच्या सरकारने जो निर्णय घेतला होता त्याच्यापेक्षा अधिक चांगला निर्णय घेता येईल हे पाहू असेही ते म्हणाले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








