Uddhav Thackeray On Devendra Fadnavis : हवी तेवढी चौकशी करा. सूरज चव्हाण साधी शिवसैनिक आहे.हवी तेवढी चौकशी करा. भाजपच्या मनामध्ये भिती बसली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले हे मविआ परिवार बचाव बैठकिला गेले आहेत.मी फडणवीसांना एवढचं सांगेन परिवार तुम्हाला सुध्दा आहे. एवढ्या खालच्या पातळीवर जाऊ नका. तुमच्या देखील परिवाराचे व्हिडिओ बाहेर येत आहेत.आम्ही अजून त्याच्यावर बोललो नाही.तुमच्या परिवाराविषयी बोलायला लागलो तर तुम्हाला शवासन करावं लागेल.बाकीची आसनं तुम्हाला झेपणार नाहीत.त्यामुळे परिवाराबद्दल बोलू नका. मी माझ्या परिवाराबद्दल संवेदनशील आहेच.सुरज, सगळे सिवसैनिक, महाराष्ट्र माझं कुटुंब आहे.माझं कुटुंब माझीच जबाबदारी आहे. तुमच्या कुटुंबाची जबाबदारी दुसरं कोण घेत असेल तर ते तुमचं तुम्हाला माहित.मी माझ कुटुंब जपणार. ते माझ्या सोबत आहे असा इशारा उध्दव ठाकरे यांनी फडणवीस यांना दिला. मुंबईतल्या शिवाजी नाट्य मंदिरात आज शाखाप्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकित 1 जुलैच्या मोर्चाबद्दल उध्दव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले.यावेळी बीएमसीच्या ईडी चौकशीवरून भाजपवर धारदार टीकास्त्र सोडले.
यावेळी बोलताना ते म्हणाले की,उध्दव ठाकरेंना खलनायक ठरवता. जनता ठरवेल की नायक आहे की खलनायक ते.पण तुम्ही नालायक आहात हे मात्र जनतेला माहित आहे, अशा शब्दात फडणवीसांवर बोचरी टिका ठाकरेंनी केली. पुढे बोलताना ते म्हणाले की,कोव्हिडमध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू होता. मोदींनीच साथरोग कायदा लागू केला होता. आणिबाणीच्या प्रसंगी नियमांच्या बाहेर जाऊन प्राथमिकता द्यावी लागते. ती कोवीड काळात दिली.त्यामुळे चौकशी करायची असेल तर ठाणे पालिकेची करा. PM फंडात करोडो रुपये गोळा झाले ते पैसे गेले कोठे? बिघडलेले व्हेंटिलेटर दिले गेले याची चौकशी कोण करणार? ज्या सरकारचा जन्म खोट्यातून ते काय चौकशी कऱणार. छत्रपती शिवाजी महाराजांनी गुजरातची सूरत लुटली होती.हे वर बसलेले दलाल महाराष्ट्राची राजधानी लुटत आहेत. मुंबई मॉडेलचं जगात कौतुक झालं. पण या नालायकांना त्याचं कौतुक नाही ! अशी खरबरीत टीका त्यांनी केली.
पुढे बोलताना ते म्हणाले की, तुम्ही आमची चौकशी करतायं आम्ही पण करणार. उध्दव ठाकरे एवढे वाईट असता तर इतके लोक माझ्यावर प्रेम का करतात.मिळेल तिथे खा ही तुमची परंपरा आहे, आमची नाही. आज मुंबईतील घोटाळा आम्ही बाहेर काढतोय म्हणून हे कोवीड काळातील घोटाळा बाहेर काढताहेत.कोविडकाळात महाराष्ट्राला किती लसी दिल्या? असा सवाल यावेळी त्यांनी केला. मेहबुबा मुफ्ती यांच्या बाजूला मुद्दाम बसलो. तुम्ही मुफ्तीच्या बाजूला बसला तेव्हा तुमचं हिंदुत्व सुटलं का? आम्ही दिंदुत्व सोडलं नाही, सोडनार नाही. पण तुमचा बेगडी हिंदुत्वाचा बुरखा फाडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा उध्दव ठाकरे यांनी दिला.