”आईच्या दूधाशी बेईमानी करू नका हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मंत्र जपत तुम्ही शिवसेनेसोबत राहत निष्ठेचे पालन केले आहे. कोणत्याही धमक्या आणि प्रलोभनांना बळी न पडता आपण एकनिष्ठ राहिलात आणि शिवसेनेला बळ दिलेत. आई जगदंबा तुम्हास निरोगी आयुष्य देवो हीच प्रार्थना.” अशा आशयाचे पत्र शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सेनेतील १५ आमदारांना लिहले आहे. संकटाच्या काळातही निष्ठा दाखवल्यानं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचे आभार मानले आहे. (Uddhav Thackeray letter to 15 MLA)
हेही वाचा- शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांच्या गाडीला अपघात
शिवसेना हा आपला परिवार आहे. आजही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच आपले सर्वस्व आहेत. निष्ठा आणि अस्मितेची महती आपल्याला बाळासाहेबांनी शिकवली आहे. शिवसेनेचे आमदार म्हणून आपण निष्ठेचं पालन केलंत. आपल्या भूमिकेमुळं महाराष्ट्राला अभिमान वाटला आणि शिवसेनेला बळ मिळालं आहे.वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांचे पाईक असल्याचं आपण दाखवून दिलंय. आपण निष्ठेने शिवसेनेसोबत राहिलात. असंही उद्धव ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे.
Previous Articleभीमाशंकरजवळील पोखरी घाटात दरड कोसळली, एकेरी वाहतूक सुरू
Next Article अर्धवट स्थितीतील डेपोमुळे प्रवाशांना होतोय त्रास








