उद्धव ठाकरे हा एक नंबरचा कपटी माणूस आहे. मला मारण्यासाठी त्यांनी सुपाऱ्या दिल्या होत्या. पण, माझ्या आईवडिलांच्या आशिर्वादाने मी वाचलो.उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद गेल्यावर मराठी माणूस आठवला, त्यांना मी ४० वर्षापासून ओळखतो. आजारपण आणि मातोश्री यातच त्यांची सत्तेतील अडीच वर्षे गेली. मी पहिल्या शिवसेनेचा शिवसेनसैनिक आहे. १९६६ सालपासून मी शिवसेनेत राहिलो, आम्हाला साहेबांचं वेड होतं असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलं आहे.
दुसऱ्या मातोश्रीचा भविष्यकाळ आजपासून सुरू झाला आहे. राऊत मनातून खूश आहे पण उद्धव ठाकरेंचा सत्ता गेल्यावर जळफळाट होत आहे. राऊतांनी ठाकरेंच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं आहे. राऊतांनी घेतलेल्या मुलाखतीतील प्रश्न हे ठरलेले होते असा आरोप राणे यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत केला आहे.
उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद राऊतांनी घालवलं आणि पुन्हा त्यांचीच मुलाखत घेतोय, तुला जरा तरी लाज वाटते का? त्या मुलाखतीत जनतेचं हित कुठे आहे. संजय राऊत म्हणजे बनावट पत्रकार आहे. त्याची लायकी नाही, त्याला काही दर्जा नाही. ते आपल्या तालावर उद्धव ठाकरेंना नाचवत आहेत. शिवसेनेचा वारसा रक्ताने नाही तर, विचाराने चालत असतो . शिवसेनेत असताना आईवडिलांचं ऐकलं नाही अन् आता काय म्हणता शिवसेना आमची आहे? उद्धव ठाकरेंनी प्रेम, विश्वास दिला नाही, तो एकनाथ शिंदेंनी दिला. खरं तर संजय राऊतांनी शिवसेना फोडली असा हल्लाबोल राणेंनी केला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








