एप्रिल 2020 मध्ये महाराष्ट्रातील पालघरमध्ये जमावाने केलेल्या दोन साधूंच्या लिंचिंग प्रकरणाच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले नसल्याबद्दल जोरदार हल्ला चढवला. चंद्रपूर येथील जाहीर मेळाव्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा ( BJP president JP Nadda ) यांनी महाविकास आघाडीच्या (MVA) राजवटीत साधू आणि संतांना अत्यंत हिन वागणूक दिल्याबद्दल उद्धव ठाकरे (Uddhav Thakre) यांची निंदा केली.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर (Chandrapur) विधानसभा मतदारसंघावर भाजपने आपले लक्ष केंद्रीत केले. भाजपचे राष्ट्रिय अध्यक्ष चंद्रपूर दौऱ्यावर असून त्यांनी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर टिकास्त्र सोडले. आपल्या जाहीर सभेत बोलताना ते म्हणाले, “पालघरमध्ये साधूंना कशी वागणूक दिली हे तुम्ही पाहिले आहे. ‘हिंदुहृदयसम्राटां’च्या मुलाने राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या दबावात येऊन या घटनेची चौकशी सीबीआयकडे सोपवली नाही.” असा आरोप त्यांनी केला.
महाराष्ट्रातील उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या युतीला निशाण्यावर घेताना नड्डा म्हणाले, “महाविकास आघाडी ही संयुक्तपणे पैसे मिळवण्यासाठी केलेली युती आहे. त्यांनी भ्रष्टाचाराची उद्धव, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी तीन दुकाने उघडली आहेत.” असा आरोप केला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









