मुंबई : तुमच्याकडून होणार नसेल तर हात वर करा, मग शिवसैनिक बघतील कसं रक्षण करायचं ते, शिवसैनिक रक्षण करायला समर्थ आहेत.आमच्याकडून तुमचं संरक्षण शक्य नाहीये अस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगावं, मग आमचं संरक्षण आम्ही करतो असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी लगावला. काल भायखळा येथील शिवसेनेच्या दोन कार्यकर्त्यांच्या गाडीवर हल्ला झाल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भायखळा येथील शिवसेनेच्या शाखेला भेट दिली. यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.
भाजपावर निशाणा साधताना ते म्हणाले, ज्यांनी तक्रार केली त्यांना सुरक्षा दिली, मग शिवसेना पदाधिकाऱ्यांना का दिली नाही? असा सवाल उपस्थित करत पोलिसांना धारेवर धरले. पुढे बोलताना ते म्हणाले, शिवसैनिकांच्या केसाला जरी हात लागला तरी तुम्ही जबाबदार असाल. लढायचं ते लढू. पण जीवाशी खेळ होणार असेल तर शांत बसणार नाही.तुम्ही राजकारणात पडू नका, राजकारणाचं काय करायचं ते आम्ही बघू अशा इशाराही यावेळी त्यांनी दिला.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








